Rajanand More
कोंडा सुरेखा या तेलंगणातील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांची आमदारकीची ही तिसरी टर्म असून सध्या वारंगल पूर्व मतदारसंघाच्या आमदार आहेत.
अभिनेते नागार्जुन यांचे पुत्र नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभु यांच्या घटस्फोटामागे बीआसएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांचा हात असल्याचा दावा कोंडा सुरेखा यांनी केला होता.
नागा चैतन्य यांनी समंथाला केटीआर यांच्याकडे एका कामासाठी जाण्याबाबत जबरदस्ती केली होती. त्यातूनच त्या दोघांमध्ये वाद झाल्याचा दावा कोंडा सुरेखा यांनी केला होता.
मंत्र्यांच्या विधानानंतर नागार्जुनसह समंथा आणि तेलुगू इंडस्ट्रीमधील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. समंथा यांनी कोंडा सुरेखा यांच्यावर टीका केली होती.
वाद निर्माण कोंडा सुरेश यांनी समंथा यांची जाहीर माफी मागितली. एका नेत्याद्वारे महिलांच्या अपमानावर प्रश्न उपस्थित करणे, हा माझ्या विधानाचा उद्देश होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
मंत्र्यांच्या माफीनाम्यानंतर नागार्गुन यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. केवळ समंथाची माफी मागितली. या प्रकरणात माझ्या कुटुंबाचीही बदनामी झाली, त्याचे काय, असा सवाल नागार्जुन यांनी उपस्थित केला.
नागार्जुन यांनी मंत्र्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे आता कोंडा सुरेखा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोंडा सुरेखा यांनी आपली माफी मागितली तरी आपण दावा मागे घेणार नाही, असे नागार्जुन यांनी स्पष्ट केले आहे. इंडस्ट्री सॉफ्ट टार्गेट असू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.