सरकारनामा ब्यूरो
भारतीय लष्कराने दळणवळणासाठी स्वतःची मजबूत संपर्कासाठी SAMBHAV (Secure Army Mobile Bharat Version) यंत्रणा तयार केली आहे.
लष्कर दिनाला ही प्रणाली संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आली आहे.
अनेक स्तरांवर 'एनक्रिप्टेड' असलेली ही मोबाइल प्रणाली इतकी सुरक्षित आहे, की कोणताही देश यातून डेटा चोरू शकणार नाही.
सैन्याच्या सुरक्षित संभाषणासाठी 5G तंत्रज्ञानावर आधारीत या यंत्रणेला भारतीय लष्कराने 'SAMBHAV इकोसिस्टम' असे नाव दिले.
'SAMBHAV' मुळे भारतीय लष्कराचे परस्परातील संवाद सुरक्षित राहण्यास मदत होईल.
हे 5G तंत्रज्ञानावर चालणाऱ्या यंत्रणेमुळे भारतीय लष्कराचा सगळा डेटा सुरक्षित राहील.
बळकट आणि विश्वासू सिस्टिम असल्याने यात अंतर्गत गोपनीयता राखली जाईल.
'रिअल टाइम लाइव्ह'
SAMBHAV ही 'रिअल टाइम लाइव्ह' पद्धतींवर कार्य करणारी प्रणाली आहे.
जलद आणि गतिशीलता असलेल्या या प्रणालीमुळे लष्करातील सर्व कारवाया अधिक सक्षम होतील.