Deepak Kulkarni
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात अनेक मोठे राजकीय खुलासे केले आहेत.
शर्मिष्ठा यांनी ‘In Pranab, My Father: A Daughter Remembers’ या पुस्तकात वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना बडे खुलासे केले आहेत.
राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जींना का स्थान मिळाले नाही, यावरही मोठा दावा या पुस्तकात केला आहे.
त्यांनी याच पुस्तकात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांंच्याबाबतही अनेक दावे केले आहेत.
याच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
या भेटीवेळी शर्मिष्ठा मुखर्जींनी ‘प्रणब माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तकही मोदींना भेट दिले.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
माझ्या वडिलांशी असलेला त्यांचा आदर आजही कमी झालेला नाही या आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत.
माझ्या वडिलांशी असलेला त्यांचा आदर आजही कमी झालेला नाही या आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे.