Ganesh Sonawane
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन 5 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
नागपूर ते मुंबई असा 701 किमीचा हा महामार्ग असून देशातील सर्वांत रुंद महामार्ग आहे. जो आता पूर्णपणे महाराष्ट्राच्या सेवेत दाखल झाला आहे.
महामार्गाच्या उद्घाटनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या महामार्गासाठी लागलेल्या सिमेंट, स्टिलची आकडेवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
या प्रकल्पासाठी तब्बल 12 कोटी सिमेंटच्या बॅग्स लागल्या आहेत.
सात लाख मेट्रिक टन इतके स्टील लागले आहे.
13 कोटी घनमीटर भराव केला आहे. आठ कोटी घनमीटर खोदकाम केलं. खोदकामानंतर आलेल्या मलब्यातून 6 कोटीचा मालाचा पुनर्वापर केला गेला.
या प्रकल्पाची किंमत 55 हजार कोटींची होती. परंतु या प्रकल्पासाठी शेवटपर्यंत 61 हजारांवर खर्च लागला आहे.
समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. ज्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण पीएम मोदी, दुसऱ्या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर तिसऱ्या व आव्हानात्मक अशा तिसऱ्या टप्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.