Rashmi Mane
'माझी लाडकी बहीण' योजनेतून लाभ मिळण्यात अडथळा
मे महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 2 कोटी 47 लाख महिलांना मिळणार थेट आर्थिक मदत मिळणार आहे.
5 लाख महिलांचा लाभ अडकला आहे. त्याचे कारण म्हणजे केवायसी पूर्ण न केल्यामुळे योजनेचा हफ्ता रोखला गेला. बँक खातं आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.
KYC म्हणजे खात्रीशीर ओळख. त्यामुळे बँक खातं व आधार लिंक केल्याशिवाय पैसा मिळणार नाही. महिलांनी लवकरात लवकर KYC अपडेट करणं गरजेचं.
बोगस नावे योजनेत? काही अपात्र महिलांनीही अर्ज केल्याची शक्यता.
त्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून माहिती मागवली.
केंद्र सरकारला पत्रव्यवहार सुरू. आयटीआर डेटा मिळावा यासाठी केंद्र सरकारला विनंती. लवकरच निर्णयाची अपेक्षा.
कोण पात्र?
वय: 21 ते 65 वर्षे
वार्षिक उत्पन्न: 2.5 लाखांपेक्षा कमी
विवाहित, घटस्फोटित, विधवा वा निराधार महिला