Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात संदीपान भुमरे देणार खैरे, इम्तियाज जलील यांना आव्हान!

Mayur Ratnaparkhe

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीने मंत्री संदीपान भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

संदीपान भुमरे हे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी संदीपान भुमरे यांना पक्षांतर्गत विरोध फारसा नाही.

संदीपान भुमरेंचे नाव चर्चेत आल्यापासूनच भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

संदीपान भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत

एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांच्या रुपात मराठा उमेदवार दिला आहे. 

मला जर उमेदवारी जाहीर झाली तर मीही निवडून येऊ शकतो, असा दावा भुमरे यांनी काही दिवस आधीच केला होता.

खैरे, भुमरे की इम्तियाज जलील, कोण होणार छत्रपती संभाजीनगरचा खासदार? आता हे पाहावे लागणार आहे.

NEXT : 'या' आमदारांना पहिल्यांदाच लागली लोकसभेच्या उमेदवारीची लॉटरी