Sanjay Dutt News : संजूबाबा लोकसभा निवडणूक लढवणार? ; जाणून घ्या, काय दिलं उत्तर!

Mayur Ratnaparkhe

लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय दत्त राजकारणात येऊ शकतो, अशी चर्चा आहे.

काँग्रेस संजय दत्तला हरियाणातील करनालच्या हॉट सीटवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते, असं बोललं जात आहे.

मात्र, संजय दत्तचा राजकारणात येण्याचा अद्याप कोणताही विचार नाही.

खुद्द संजय दत्तने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा केली आहे.

संजय दत्तने या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीए. मी निवडणूकही लढवत नाहीए, असं संजय दत्तने स्पष्ट केलं आहे.

खरंतर २००९-२०१० दरम्यान मुलायम सिंह यांच्या समाजवादी पार्टीचा सरचिटणीस म्हणून संजय दत्तने काम केलेलं आहे.

एवढंच नाहीतर २०१९ साली संजय दत्त हा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

संजय दत्तबाबत राजकारण प्रवेशाच्या चर्चा अधूनमधून उठत असतात

Next : तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत मुख्यमंत्री शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत

येथे पाहा