Jagdish Patil
देशभरात गाजलेलं पूजा खेडकर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी काळातील मोठा घोटाळा समोर आला आहे.
सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थी काळात केलेला घोटाळा चर्चेत आला आहे.
शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी काळात आदिवासी विभागात कार्यरत होते.
या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली होती. यात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा ठपका सरकारनं ठेवला आहे.
लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतः वळवून घेणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्या विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावणं असे गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदिवासी विभागानं सामान्य प्रशासन विभागकडे कारवाईसाठी अहवाल पाठवल्याची माहिती आहे.
या प्रकरणी अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांनी हा चौकशी अहवाल तयार केला आहे.
सामान्य प्रशासन विभाग दिल्लीतील डीओपिटीकडे अहवाल पाठवून कारवाई करण्याची मागणी करणार असल्यामुळे आता गुप्ता यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.