Mangesh Mahale
संग्राम मळकर यांना दहावीत 60 टक्के , अकरावीत 35 टक्के, बारावीत 47 टक्के मिळाले होते.
2009 मध्ये पुण्यात आले. शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज काढलं
2010 मध्ये वडीलांचे निधन झाले, त्यामुळे ते खचून गेले. सहा वर्ष अपयश पचवलं
दोन वर्ष शेतीमध्ये घालवली. लोक हसत होते, उलट सुलट बोलत होते.आईनं सांभाळून जपलं
२०१२ मध्ये पदवी झाल्यानंतर शेती केली. दोन महिने स्पर्धा परीक्षेला क्लास लावला त्यानंतर घरीच अभ्यास केला.
2017 मध्ये पीएसआय परीक्षेची तयारी केली. आठ-दहा तास अथक परीश्रम केले. हॉटेलमध्ये वेटरचे काम केले.
2017-18 च्या पीएसआय परीक्षा निकालात'संग्राम मळकर' हे नाव झळकलं.
जो मुलगा कालपर्यंत वेटर होता तो आज 'खाकी वर्दीतला साहेब' झाला. त्याच हॉटेलात त्यांचा सत्कार झाला.
NEXT: विदेशात कोट्यवधीची आलिशान संपत्ती! कोण आहेत इराणचे नवे नेते मोजतबा हुसैनी खामेनेई