Sunil Balasaheb Dhumal
धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीने खेचून घेतल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे.
लोकसभेसाठी इच्छुक असलेले मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.
तीन हजार गाड्यांतून पंचवीस हजार समर्थकांसह त्यांनी घेऊन धनंजय सावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला मुंबईला गेले.
धाराशिवची जागा शिवसेनेकडे घेऊन उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याचे संकेत धनंजय यांनी दिले आहेत.
धनंजय सावंत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिले आहेत.
त्यांनी लोकसभेसाठी जिल्हाभरात भावी खासदार अशा आशयाचे होर्डिंग लावले होते.
नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी खासदारकीची तयारीही सुरू केली होती.
आता मात्र त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून ते महायुतीच्या उमेदवाराला धक्का देण्याच्या तयारीत आहे.