सरकारनामा ब्युरो
संजय गांधी भारतीय राजकारणातील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त नेत्यांपैकी एक होते.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र या पलिकडे जाऊन त्यांनी आपली प्रतिमा तयार केली होती.
काँग्रेसमध्ये संजय गांधी हेच इंदिरा गांधींनंतर पक्षाचा चेहरा मानले जात होते.
पण त्यांच्या विमान अपघातातील मृत्यू देशाला आणि भारतीय राजकारणाला धक्का देणारा ठरला.
संजय गांधी यांना वेगाने गाडी आणि विमान चालवणे आवडत होते. पण त्याच्या याच छंदाने त्यांचे प्राण हिरावले असे म्हटले जाते.
राजकीय अभ्यासक विनोद मेहता यांच्या 'द संजय स्टोरी' या पुस्तकामध्ये संजय गांधींबाबत अनेक किस्से सांगण्यात आले आहे.
संजय गांधी हे कोल्हापुरी चपला घालून विमान उडवायचे. पण या चप्पल कॉकपिटमध्ये हवेचा उच्च दाब सहन करण्यास सक्षम नव्हत्या.
संजय यांचे मोठे भाऊ आणि प्रशिक्षित पायलट राजीव गांधी यांनीही त्यांना अनेक वेळा याबद्दल इशारा दिला होता.
राजीव गांधींनी संजय यांना उड्डाणादरम्यान चप्पलऐवजी बूट घालण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
Emergency : महाराष्ट्राच्या चार रणरागिणी पेटून उठल्या अन् थेट इंदिरा गांधींविरोधात मैदानात उतरल्या