Deepak Kulkarni
दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे.
कोल्हापूर लोकसभेला शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट सामना होणार आहे.
प्रचारादरम्यान, कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती हे कोल्हापूरचे महाराज आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे खळबळजनक विधान केले.
यामुळे कोल्हापूरसह राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
पण शिवसेनेचे लोकसभा उमेदवार संजय मंडलिक नेमके आहेत तरी कोण हे आपण पाहुयात...
संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक चारवेळा खासदार राहिले होते.त्यामुळे साहजिकच कोल्हापूर घराण्यात मंडलिक घराण्याचा प्रचंड दबदबा होता.
सदाशिवराव मंडलिक आणि विजयमाला मंडलिक या दाम्पत्याच्या पोटी 13 एप्रिल 1964 रोजी कोल्हापुरात संजय मंडलिक यांचा जन्म झाला.
2014 राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी 2014 मध्ये संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्याकडून 33,259 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
अखेर 2019 च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांना 2,70,568 अशा दणदणीत मताधिक्याने मात देत जुन्या पराभवाचा वचपा काढला.
कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक सध्या मंडलिक या घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत.