Sanjaykaka Patil : केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या संजयकाका पाटलांना यंदा भाजपतूनच विरोध....

Vijaykumar Dudhale

घरातूनच मिळाले राजकारणाचे बाळकडू

खासदार संजय पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले. तासगावचे माजी दिनकर आबा पाटील यांचे संजय पाटील हे पुतणे आहेत.

Sanjaykaka Patil | Sarkarnama

सांगलीचे नगरसेवक

संजय पाटील यांची राजकीय सुरुवात सांगलीच्या नगरसेवकपदापासून झाली. ते 1982 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक, तर पुढे ते उपनरागध्यक्षही बनले.

Sanjaykaka Patil | Sarkarnama

सांगली झेडपीत एन्ट्री

सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक संजय पाटील यांनी 1996 मध्ये लढवली आणि विजय मिळविला.

Sanjaykaka Patil | Sarkarnama

आरआर आबांना दिली टक्कर

संजय पाटील यांनी 1999 आणि 2004 मध्ये तासगावमधून (स्व.) आर. आर. पाटील यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. संजयकाका यांचा 2004 मध्ये अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता.

Sanjaykaka Patil | Sarkarnama

विधान परिषदेवर संधी

संजय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे विधान परिषदेवर पाठविले. त्यातून आर आर आबा आणि संजयकाका यांच्यातील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न झाला.

Sanjaykaka Patil | Sarkarnama

केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव

संजय पाटील यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याच निवडणुकीत त्यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा दोन लाख ३८ हजार मतांनी पराभव केला

Sanjaykaka Patil | Sarkarnama

सांगलीतून पुन्हा विजय

भाजपने 2019 मध्ये संजय पाटील यांना सांगलीतून पुन्हा उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या घरातील विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला

Sanjaykaka Patil | Sarkarnama

माजी आमदाराचा विरोध

संजय पाटील यांना 2014 साठीही भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांना यंदा पक्षातूनच विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा पाठिंबा आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे.

Sanjaykaka Patil | Sarkarnama

यंदाच्या लोकसभा निवडणुकांची अशी आहेत वैशिष्ट्ये...

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा