Vijaykumar Dudhale
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. साताऱ्यात पक्ष वाढविण्याची जबाबदारी अजित पवार यांनी निंबाळकर यांच्या खांद्यावर दिली आहे.
फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यांनी त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर या तीन बंधूंनी 1991 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून फलटणची सर्व सत्तास्थाने निंबाळकरांच्या ताब्यात आहेत.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण पंचायत समितीचे सभापती, श्रीराम साखर साखर कारन्याचे अध्यक्ष, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे संचालक, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे.
फलटणच्या याच तीन निंबाळकर बंधूंनी रविवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी रामराजे यांना निंबाळकर यांना मदत करण्याची विनंती केली होती. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपण आपला निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार आज फलटणमध्ये मेळावा घेण्यात आला.
फलटणच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना न विचारता दिलेला माढ्याचा उमेदवार बदलण्याची मागणी केली, अन्यथा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी तुतारी हाती घ्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला.
रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन तुतारी हाती घेणार का, याची उत्सुकता आहे.
R