Rashmi Mane
संजीता मोहापात्रा यांची नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते. असे मानले जाते पण संजीता मोहापात्रा यांच्या बाबतीत हे उलट आहे.
त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे पती बिस्व रंजन मुंडारी यांना देतात.
संजीता मोहापात्रा यांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बरीच वर्षे लागली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
त्यांच्या 4 प्रयत्नांमध्ये त्या अपयशी ठरल्या. पण त्याची हिम्मत डगमगली नाही. यावेळी बिस्व रंजन मुंडारी आणि सासरच्या मंडळींनी त्यांना खूप साथ दिली.
संजीता मोहापात्रा यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही.
संजीता मोहापात्रा UPSC परीक्षेत 2019 मध्ये स्वयं अभ्यासाच्या जोरावर 10 वा क्रमांक मिळवला. महापात्रा या डहाणू, महाराष्ट्र येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.