Rashmi Mane
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता यूपीमध्ये बनणार असलेले श्री कल्की धाम चर्चेत आहे. कल्की हा भगवान विष्णूचा 10वा अवतार मानला जातो.
कल्कि पुराणानुसार, संभल गावात कल्की अवतार होणार आहे, त्यामुळे 19 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये श्री कल्की धामचे भूमिपूजन होणार आहे.
या संदर्भात कल्की धामचे पीताधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे. या सोहळ्यासाठी, तेव्हापासून प्रमोद कृष्णम चर्चेत आहेत.
ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांचा जन्म 4 जानेवारी 1965 रोजी उत्तर प्रदेशातील संभल येथील एन्कोडा कंबोह गावात झाला.
प्रमोद कृष्णम यांची गणना यूपीमधील काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी काँग्रेसकडून दोनदा निवडणूक लढवली आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेस नेते आणि संत देखील आहेत.
या भेटीनंतर आचार्य लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम हे दीर्घकाळ काँग्रेसमध्ये आहेत. पक्षात विविध पदे भूषवण्यासोबतच त्यांनी संभल आणि लखनौमधून लोकसभा निवडणूकही लढवली आहे.