Sanjog Waghwere Rally : 'मशाल' हाती घेतलेल्या वाघेरेंनी शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

Deepak Kulkarni

अर्ज दाखल

मावळ लोकसभेतील महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील यांनी मंगळवारी (ता.23) दाखल केला. 

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

वाघेरेंचीही पिंपरी-चिंचवडमधून रॅली

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसारखी वाघेरेंनीही पिंपरी-चिंचवडमधून रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला. 

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

हा विश्वास...

मावळात गद्दारी गाडली जाऊन निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय होईल आणि स्वाभिमानी ठाकरे शिवसेना मावळचा गड कायम राखेल, असा दावा अर्ज भरल्यानंतर वाघेरेंनी केला.

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

महापुरुषांना अभिवादन

रॅलीपूर्वी वाघेरेंनी महापुरुषांना अभिवादन केले. तसेच आराध्य दैवतांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट

महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीकडून उबाठाच्या संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे.

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

संपत्ती....

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे 18 कोटी 44 लाख रुपयांचे धनी आहेत. 

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

दोन अर्ज भरले

दरम्यान, अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी मावळमध्ये सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे ते भरणाऱ्यांची संख्या आता दहा झाली. वाघेरेंनी दोन अर्ज भरले.

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत

रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत होऊ तेथे आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आदींची भाषणे झाली.

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

घोषणाबाजी...

रॅलीत सहभागी झाले होते."गद्दारांचा भरला घडा, त्यांना शिकवू धडा", "एकजुटीने जागवा, निर्धार भगवा", "आता हवा, खासदार नवा", "आली रे आली, पाटलांची बारी आली" अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

R

Sanjog Waghwere Rally | Sarkarnama

NEXT : लोकसभेत 'या' बड्या नेत्यांनी हाती घेतले बंडाचे निशाण

Sanjog Waghwere Rally