Ganesh Sonawane
संसदेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
यंदाच्या संसद रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना 'संसद रत्न 'पुरस्कार जाहीर झाला आहे. (पक्ष-शिवसेना)
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा `संसद रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.(पक्ष- शिवसेना)
पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
जळगावच्या भाजपच्या लोकसभा खासदार स्मिता वाघ
पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
जुलै महिन्यात नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.