Jagdish Patil
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेला पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या.
देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडनंतर बीड हत्या प्रकरणात घुलेचेच नाव चर्चेत आहे.
तर सुदर्शन घुले मोस्ट वाँटेड गुन्हेगार कसा झाला आणि तो नेमका कोण आहे? याबाबतची माहिती समोर आली आहे.
सुदर्शन घुले हा केज तालुक्यातील टाकळी गावचा असून त्याचं शिक्षण सातवीपर्यंत झालं आहे.
शाळा सोडल्यानंतर तो भाईगिरीचा करू लागला, नेत्यांच्या सांगण्यावरून लोकांना धमकावणं, मारहाण करणं असली कामे करायचा.
तर घुलेवर अनेक चोरीचे आरोप असल्याची धक्कादायक माहिती देखील गावकऱ्यांनी सांगितली.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला आईने वाढवलं तो साध्या पत्र्याच्या घरात रहायचा. मात्र, त्याच्याकडे एक एक स्कॉर्पिओ आहे.
मस्साजोगमधील पवनचक्की प्रकल्पात प्रवेश करताना घुलेचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. यावेळी संतोष देशमुख मध्यस्थी करण्यासाठी आल्याच्या रागातूनच त्याने हत्येचा कट रचल्याचं सांगितलं जात आहे.