Aslam Shanedivan
गेल्या काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केले जातील अशी शंका विरोधकांनी केली होती
तर ही शंका आता खरी ठरताना दिसत असून योजनेच्या निकषात बदल केले जाणार आहेत.
या योजनेच्या अर्जांची छाननीने काम सरू झाले असून महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी निकषांची माहिती दिली आहे.
तटकरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ दिला जाणार आहे.
एकच लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर अर्जांबद्दलही पुनर्विचार केला जाणार. उदा. 'नमो शेतकरी' योजनेचा फायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणीला फक्त ५०० मिळणार
चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार असून अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही.
आधार कार्ड आणि बँकेच्या नावात तफावत असल्यास केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतरच ई केवायसी होईल. त्यानंतरच अर्जांवर विचार केला जाईल
शासकीय नोकरीत असलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.