Mangesh Mahale
8 डिसेंबर : आरोपी विष्णू चाटे अन् सुदर्शन घुले या दोघांनी बीडच्या नांदूर फाटा परिसरातील एका ढाब्यावर हत्येचा कट
9 डिसेंबर : कटानुसार सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली.
14 जानेवारी रोजी संबंधीत ढाबा चालकाची चौकशी केल्याची माहिती आहे.
कट रचत असताना ढाब्यावर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेसोबत इतरही काही लोक असल्याची माहीती आहे.
देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड हा आरोपींच्या संपर्कात होता.
चाटे अन् घुले यांनी 3 वाजून 15 मिनिटांच्या दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण केले.
तीन वाजून 20 मिनिटांनी खुनाची आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फोनवर 10 मिनिट संभाषण झाले.
देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती.
वाल्मिक कराड याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच न्यायालयात सादर करण्यात आली.
कटात अजून कुणाचा सहभाग आहे, याचा शोध सुरू आहे.