Rajanand More
मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरची लेक सारा अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियातील तिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एका वेगळ्याच कारणाने ती चर्चेत आली आहे.
सारा एका सरकारी पर्यटन मोहिमेचा भाग बनली आहे. या मोहिमेसाठी तब्बल 1137 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलिया सरकारच्या ‘कम अन्ड से गुड डे’ (Come and Say G’Day) या आंतरराष्ट्रीय पर्यटन मोहिमेसाठी साराची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारकडून 2022 पासून ही मोहिम राबविली जात आहे. यावर्षी त्याचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात विविध देशांतून स्थानिक प्रसिध्द चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे.
भारतासह चीन, जपान, ब्रिटन, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये या मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलियातील पर्यटनाचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. भारतातील पर्यटकांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी सारावर असणार आहे.
साराने नुकताच संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. देशातील विविध पर्यटनस्थळांना तिने भेट दिली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियात पोस्ट केले होते. तिला या देशाचे विशेष आकर्षण आहे.
साराही सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 8 मिलियनही अधिक फॉलोअर्स आहेत. तरूणाईमध्ये तिची क्रेझ आहे. तसेच ती सचिन तेंडूलकरची लेक असल्याने तिची निवड करण्यात आली आहे.
सारा केवळ सोशल मीडियाच नव्हे तर टीव्ही जाहिराती, इतर डिटिटल माध्यमांमध्येही ऑस्ट्रेलियातील पर्यटनाचा प्रचार करताना दिसेल. पुढील काही दिवसांत ही मोहीम सुरू होणार आहे.