Sardar Raja Iqbal Singh : दिल्लीचे नवीन महापौर होणारे सरदार राजा इक्बाल सिंग आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

भाजपकडून संधी -

दिल्लीत महापौर निवडणुकीसाठी सरदार राजा सिंग यांना भाजपने निवडले आहे.

निवडणूक कधी?

दिल्लीत २५ एप्रिल रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे

महापालिका विरोधी पक्षनेते -

सरदार राजा इक्बाल सिंग सध्या दिल्ली महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवत आहेत.

भाजपमध्ये वेगाने वर आले -

'अकाली'च्या राजकारणातून आलेले राजा इक्बाल सिंग भाजपमध्ये वेगाने उदयास आले आहेत.

जीटीबीचे नगरसेवक -

सरदार राजा इक्बाल सिंग हे जीटीबी नगरचे नगरसेवकही राहिले आहेत.

अर्ज दाखल -

आता दिल्लीच्या महापौर पदासाठी सरदार राजा इक्बाल सिंग यांनी अर्ज दाखल केला आहे

भाजपचे नेते-

राजा इक्बाल सिंग हे भाजपच्या अशा नेत्यांमध्ये गणले जातात जे बोलण्यात सावध असतात.

विजय निश्चित? -

राजा इक्बाल सिंग यांचा विजय जवळपास निश्चितच मानला जात आहे.

Next : आज कोण काय म्हणाले?

Maharashtra Politics | Sarkarnamaa
येथे पाहा