सरकारनामा ब्यूरो
सोमवारचा दिवस महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडींमुळे गाजला. जाणून घ्या आज कोणत्या राजकीय नेत्यानं काय विधान केलं! वाचत राहा!
केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कांद्यावरील निर्यातशुल्क हटवण्याचा निर्णय उशीरा घेतला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
- राजू शेट्टी
उद्धव ठाकरे शाळकरी मुलांसारखे अटी घालत आहेत. त्या अटी-शर्तींवर राज ठाकरे तडजोड करतील, असं मला वाटत नाही.
- उदय सामंत
शेतकऱ्यांना एका रुपयात विमा देण्याची योजना आम्ही सुरु केली होती. पण या योजनेत अनेकांनी आम्हाला चुना लावला. याचा सगळा तपशील आम्ही काढला आहे.
- अजित पवार
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार असतील तर आमच्या शुभेच्छाच आहेत. पण आम्ही सारे रिपब्लिकनवाले भाऊ कधी एकत्र येणार?
रामदास आठवले
आमच्याकडे पाच वर्षे २३७ आमदार आहेत. ज्यांना युतीत राहायचं नाही, ते बाहेर पडतील.
- अतुल सावे
आता मी बोलायचं नाही असं ठरवलं आहे. पण कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. कुणी काय केलं याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे.
- जयकुमार गोरे
ठाकरे बंधू एकत्र येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यास आनंदच होईल.
- रोहित पाटील