Dinvishesh 4 December : इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म; गेट वे ऑफ इंडिया'चे उद्‌घाटन, सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक अन्...

Mayur Ratnaparkhe

1919 - भारताचे १२ वे पंतप्रधान बनलेल्या इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म

1924 - "भारताचे प्रवेशद्वार' म्हणून ओळखले जाणाऱ्या "गेट वे ऑफ इंडिया'चे व्हाईसराॅय लाॅर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्‌घाटन.

1948 - भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक.

1971- भारत पाकिस्तान युद्धात आॅपरेशन ट्रायडंट अंतर्गत भारतीय नौदलाचा कराचीवर तुफानी हल्ला

1981 - दिल्लीच्या कुतुबमिनारच्या जिन्यामध्ये भीषण चेंगराचेंगरी. गुंडांनी अचानक दिवे घालवल्याने घडली दुर्घटना

1982 - नवी दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा शानदार समारोप

2001 - तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची तान्सी जमीन गैरव्यवहार आणि प्लेझंट स्टे हाॅटेल गैरव्यवहार प्रकरणातून उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.

2003 - विधानसभा निवडणुकांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये काँग्रेसचा पाडाव करुन भाजपने मिळवली सत्ता. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये मिळवले होते निर्विवाद बहुमत

2004 - विशेष सामाजिक कार्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना चौथा पावलोस मार ग्रेगोरिअस पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ विचारवंत डॉ. पावलोस मार ग्रेगोरिअस यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

Next : यूपीएससी परीक्षेत साडीवर विचारला प्रश्न अन् खूबसूरत उत्तर

IAS Shrestha Sree | Sarkarnama
येथे पाहा