Jagdish Patil
9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये कामबंद आंदोलन केलं जाणार आहे.
या कामबंद आंदोलनाची माहिती पंचायतराज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिली आहे.
राज्यभरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या परिषदेने केली आहे.
तर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते जाणून घेऊया.
स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी.
सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा. प्रत्येक ग्रामसभेला पोलिस संरक्षण अनिवार्य करण्यात यावे.
देशमुख कुटुंबियातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी. देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभारावं.
राज्यभरातील सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू करावी. तसंच ग्रामसभा सर्व ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा.