Amol Sutar
खासदार उदयनराजेंना आलिशान गाड्यांचे भलतेच वेड आहे. त्यातूनच त्यांनी जीवनात कमी वयात पहिल्यांदा वाहन खरेदी केले ते जिप्सी होते.
त्यांनी बीएमडब्लू (BMW) या कंपनीची TEX 5 ही गाडी विकत घेतली. या गाडीचा नंबरही त्यांच्या नेहमीच्या म्हणजेच, जेम्स बॉन्ड नंबरशी निगडित...007 असा आहे.
राजेंनी जिप्सीनंतर लगेचच महिंद्रा कंपनीची त्यावेळची थार घेतली. त्यानंतर टाटा सियार, टाटा इस्टेट, स्कॉर्पिओ, मर्सिडीज, ऑडी, सफारी, पजेरो गाड्यांचा शौक पूर्ण केला.
राजेंना 007 क्रमांकाच्या जिप्सीतून शहरात फेरफटका मारायला नेहमीच आवडते. त्यांच्या या आवडीचे नेहमी सातारकरांना आकर्षण असते.
उदयनराजेंची ओढ वाहनांमध्ये आणि रेसिंगमध्ये होती. त्यांना छंद लागला तो रेसिंगचा. लंडन, जर्मनी, फ्रान्स या देशात ते कायमच रेसिंगच्या ट्रॅकवर दिसत होते.
उदनयराजे युवकांच्या गळ्यातील ताईत. त्यांची क्रेझ तरुणाईमध्ये कायमच पाहावयास मिळते. त्यांनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, म्हटलेले गाणे याची युवकांना आवड.
उदयनराजेंकडे इनोव्हा, जिप्सी, रेंज रोव्हर, फोर्ड या कंपन्यांच्या आलिशान गाड्या आहेत.
उदयनराजेंना गाड्यांचा छंद आहे, तसेच या गाड्यांसाठी ते 007 हा क्रमांक आवडीनं घेतात. जेम्स बॉन्ड (James Bond) नंबरशी निगडित....007.
राजेंना बुलेटचीही आवड आहे. ते बुलेट घेऊन सातारा शहरातून कधी - कधी आवडीने फेरफटकाही मारतात. त्यांच्याकडे पल्सर बाईकही आहे.
Next Political News : वर्षभरात 'या' दिग्गज नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ