सरकारनामा ब्यूरो
गेल्याच वर्षी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण, राज्य सरकारने दिवसे यांची गुरुवारी (ता.2 जानेवारी) बदली केली.
डॉ. दिवसे यांच्या जागी सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यावर पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जितेंद्र डुडी हे मुळचे जयपूर (राजस्थान) येथील रहिवासी असून झारखंड केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
स्वामी केशवानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ग्रामोथन, जयपूर येथून डुडी यांनी बी. टेक. पदवी प्राप्त केली आहे.
डुडी हे 2016 च्या तुकडीतील अधिकारी आहे. त्यांनी 364 वी रँक मिळवली होती.
डुडी यांनी केंद्र सरकारचे सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे. तसेच इतरही काही महत्वाच्या पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
2018 ला त्याची नियुक्ती केंद्र सरकारकडून महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
डुडी यांनी यापूर्वीही पुण्यात काम केले आहे. ते जुन्नर येथे प्रांतधिकारी म्हणून कार्यरत होते.