Roshan More
उमेदवाराला निवडणूक प्रचारात खर्च करण्याच्या मर्यादा आहे. केलेला खर्च आयोगाला सादर करावा लागतो. मतदानानंतर आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी नंतर 23 दिवसापर्यंत खर्च दाखवण्याची मुभा आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी केलेला खर्च सादर केला आहे.
भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सर्वाधिक 49 लाख 57 हजार 187 रुपये खर्च केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शशिकांत शिंदे यांनी 46 लाख सात हजार 679 रुपये खर्च केला.
सातार मतदारसंघातील उमेदवार प्रशांत कदम यांनी 10 लाख 20 हजार 750 रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे.
सातार मतदारसंघातून निवडणूक लढलेले बिग बाॅस फेम अभिजित बिचकुले यांनी अवघा 14 हजार 600 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षक यंत्रणेने उमेदवारनिहाय झालेल्या खर्चाचे आकडेही नोंदवलेले आहेत. त्यानुसार खासदार उदयनराजे भोसले यांचा खर्च 75 लाख 28 हजार 734 रुपये दाखवला आहे.