Rashmi Mane
राज्यात विरोधी पक्ष नेतेपद रिक्त असल्याने आता नवे चेहरे चर्चेत आहेत. यात काँग्रेसचे सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
दहा महिने उलटले तरीही विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाही. महाविकास आघाडीचे संख्याबळ अपुरे असल्याने पद रिक्त राहिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टला संपल्याने परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदही आता रिक्त झाले आहे. सध्या विधानसभेत आणि विधानपरिषदेत दोन्ही ठिकाणी विरोधी पक्ष नेते नाहीत.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते. लोक त्यांना "बंटी पाटील" म्हणून ओळखतात. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्रिपद भूषवले आहे.
सतेज पाटील हे महाराष्ट्रात कृषी, सहकार, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील सक्रिय नेते आहेत. त्यांनी राज्यात विकासकामांमुळे ठसा उमटवला आहे.
विरोधी पक्ष नेत्याला लाल दिव्याचे वाहन मिळते. तर या पदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पाटलांच्या निवडीने लवकरच काँग्रेसला लाल दिवा मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.
सतेज पाटील यांना याआधी दोनदा लाल दिव्याची गाडी वापरण्याची संधी मिळाली होती. सत्तेत नसतानाही त्यांना हा मान मिळत असल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.