Amol Sutar
सत्यजीत तांबे यांचा जन्म संगमनेर येथे दि. 27 सप्टेंबर 1983 रोजी झाला. ते महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेते आहेत.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवून ती जिंकली.
व्यवस्थापन व राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूलमध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.
2000 साली NSUIच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. 2000 ते 2007 पर्यंत ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)चे महाराष्ट्राचे सरचिटणीस होते.
2007 ते 2017 पर्यंत ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या स्थानिक प्रशासकीय मंडळाचे सदस्य होते.
ते 'जयहिंद लोकचळवळ' ही संस्था चालवतात. या संस्थेचा उद्देश लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि कर्तव्यांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे.
ही संस्था समाजातील दुर्बल घटकांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय, आर्थिक आणि इतर मदत देखील करते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत.