Rashmi Mane
मुंबई आणि पुण्याचे माजी पोलिस आयुक्त, सत्यपाल सिंह हे 1980 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी होते.
मुंबईप्रमाणेच त्यांनी पुणे, नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
सत्यपाल सिंह यांना 1990 च्या दशकात मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा कणा मोडण्याचे श्रेय दिले जाते.
29 नोव्हेंबर 1955 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बसौली येथे जन्मले आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून MSC रसायनशास्त्रात एमफिल केलं आहे.
त्यांनी ऑस्ट्रेलियातून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये एमबीए आणि नक्षलवादी चळवळीवर पीएचडीसह सार्वजनिक प्रशासनात एमए केले आहे.
2015 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील बागपत या मतदारसंघातून त्यांना तिकीट देण्यात आले होते. चौधरींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता.
परंतु या वेळेस भाजपने सत्यपाल सिंह यांचे तिकीट नाकारले आहे.
R