ज्ञानेश कुमारांकडून विचारणा अन् ट्रम्प यांना थेट झाली 'SAVE America Act'ची आठवण; काय आहे कायदा?

Rajanand More

भारतीय निवडणूक प्रणाली

जगातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रियेची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही भुरळ पडली आहे. प्रामुख्याने मतदान ओळखपत्रांबाबत ते भारावले आहेत.

election commission of india | Sarkarnama

काय म्हणाले ट्रम्प?

सोशल मीडियात पोस्ट करत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आमच्या प्रशासनाकडे वैध ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेता?, असे विचारले होते.

US Election | Sarkarnama

सेव्ह अमेरिका अॅक्ट

भारतात मागील निवडणुकीत ६४.६ कोटी मतदार होते. त्यापैकी एक टक्क्यापेक्षाही कमी मतदारांनी टपालाद्वारे मतदान केले. प्रत्येकाकडे वैध ओळखपत्र आवश्यक आहे. आता अमेरिकेत ‘सेव्ह अमेरिका अॅक्ट’ मंजूर करण्याची गरज असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.

Voting Centers | Sarkarnama

निवडणुकीत गैरप्रकार

अमेरिकेतील २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर ट्रम्प यांनी बोगस मतदान आणि गैरप्रकारांवरून आरोप केले होते. ते सातत्याने याबाबत बोलत असतात.

US Presidential Election | Sarkarnama

काय आहे कायदा?

'सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी अॅक्ट’ म्हणजेच SAVE America Act हा कायदा लागू करण्यासाठी ट्रम्प आग्रही आहेत. मात्र, त्याला प्रचंड विरोधत होत आहे.

US Election | Sarkarnama

ओळख पटविणे

निवडणुकीदरम्यान मतदारांची ओळख पटवून फसवणूक आणि बोगस मतदानाला आळा घालणे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, मतदारांना मतदानासाठी ओळख स्पष्ट होईल, अशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.

US Election | Sarkarnama

टपाली मतदानावर निर्बंध

कायद्याद्वारे टपाली किंवा मेल-इन बॅलेटच्या माध्यमातून होणाऱ्या मतदानावर निर्बंध आणण्याची तरतूद कायद्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कायद्यावर अमेरिकेच्या संसदेत एकमत होताना दिसत नाही.

US Election | Sarkarnama

राजकीय अडचण

ट्रम्प यांची या कायद्यामुळे राजकीय अडचण होऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच काही कायदेशीर समस्याही उद्भवू सकतात. त्यामुळे हा प्रस्ताव अमेरिकेत पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदु बनला आहे.

donald trump | sarkarnama

NEXT : लेकरांसाठी सोडले देशासाठी महत्वाचे असलेले पद; आता जगात होतेय चर्चा, कोण आहे ही आई?

येथे क्लिक करा.