Chetan Zadpe
पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच एका हिंदू मुलगी सवेरा प्रकाशला उमेदवारी. सवेरा प्रकाश खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
पाकिस्तानच्या 16 व्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील PK-25 सर्वसाधारण जागेसाठी सवेरा प्रकाश यांनी उमेदवारी दाखल केली.
पाकिस्तानी हिंदू सवेरा प्रकाश यांनी 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) महिला विंगच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
हिंदू धर्मीय सवेरा प्रकाश आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. सवेरा प्रकाश यांच्या वडिलांचे नाव ओमप्रकाश असून ते निवृत्त डॉक्टर आहेत.
सवेरा प्रकाश यांचे वडिलदेखील पीपीपी या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ते व्यवसायाने डॉक्टर होते, आता ते निवृत्त झाले आहेत.
बिलावल भुट्टो झरदारी हे पाकिस्तानमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख आहेत. सवेरा प्रकाश यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे.
पाकिस्तानी हिंदू मुलगी सवेरा प्रकाश यांनी फेसबुक पोस्ट करत आपण या निर्णयामुळे खूश आहोत, अशी माहिती दिली आहे.