Mangesh Mahale
फोर्ब्स इंडियाने नुकतील देशातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे.
यात सर्वाधिक श्रीमंत महिला या सावित्री जिंदल आहेत.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानीनंतर तिसऱ्या क्रमांकावर त्या आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्या ४८ व्या क्रमांकावर आहे.
सावित्री जिंदल या ओपी जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. हिसार येथील त्या खासदार आहेत.
त्यांची संपत्ती सध्या ३९.६ अब्ज डॉलर म्हणजे ३.३ लाख कोटी रुपये आहे.
सावित्री यांची संपत्ती ३५.५ अब्ज डॉलर होती. सहा महिन्यात ४.१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
जिंदल ग्रुपचे संस्थापक ओम प्रकाश जिंदल यांच्या त्या पत्नी आहेत.
त्यांच्या पतीचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांनी जिंदाल ग्रुपचे नेतृत्व स्विकारले.