सरकारनामा ब्यूरो
प्रतिक्षा त्रिपाठी या सितापूर जिल्ह्यातील दुगांना गावातील रहिवासी आहेत.
त्यांचे वडील याच गावात शिक्षक म्हणून नोकरीला होते.
लहानपणापासून हुशार असणाऱ्या प्रतिक्षा यांनी BSC मध्ये पदवी मिळवली. महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदक देण्यात आलं होतं.
2015 मध्ये त्यांनी MSC ची डिग्री मिळवली. 2020 मध्ये त्यांची निवड रेंज फॅारेस्ट अधिकारी म्हणून करण्यात आली .
रेंज फॅारेस्ट अधिकारी (RFO) म्हणून ड्यूटी करतानाच त्यांनी UPPCS ची तयारी सुरु ठेवली.
2022 मध्ये UPPCS ची परीक्षा उत्तीर्ण करत संपूर्ण भारतातून त्यांनी 20 वा क्रमांक मिळवला.
UPPCS च्या परीक्षेनंतर त्याची निवड उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणून करण्यात आली.
उत्तर प्रदेशामधील महाराजगंज येथे प्रतिक्षा त्रिपाठी यांचं पोस्टिंग करण्यात आलं.