Mangesh Mahale
गेली सहा दशके लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व देशाच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख.
लातूरचे नगराध्यक्ष ते पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली.आज वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे.
गांधी परिवाराचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख.
60 वर्षाच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप नाही, राजकीय डाग नाही,भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर नाही.
पंजाबचे राज्यपाल या पदावरून पायउतार झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणात सक्रिय नव्हते.
लातूरचे नगराध्यक्ष, आमदार ते खासदार असा 1967 पासून 2004 पर्यंत राजकीय प्रवास करत असताना त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही.
2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला,व त्यांनी कधीही निवडणुकीत सहभाग घेतला नाही.
कधी कोणाविषयी आपल्या भाषणातून, खासगीमध्ये देखील शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकीय टीका केली नाही.