Rajanand More
राज्यातील शाळांमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक जबाबदारी, जबाबदार नागरिकत्व आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश.
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये हे अभियान राबविण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
अभियानांतर्गत ‘विकसित भारत–२०४७’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित केले जातील.
स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, जलसंवर्धन, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा, फिट इंडिया आणि वीरगाथा यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.
दिव्यांगजन सहाय्य, मतदार जागृती, ‘व्होकल फॉर लोकल’, व्यसनमुक्ती तसेच पोषण आणि ॲनिमिया जनजागृतीसारखे उपक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता आणि वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य यांसारखे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
स्थानिक गरजेनुसार प्रत्येक शाळेने किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग अपेक्षित.