Lok Sabha-Rajya Sabha MP : 'या' जिल्ह्याची बातच न्यारी; एक-दोन नव्हे तब्बल नऊ खासदार संसदेत...

Rajanand More

इटावाने घडवला इतिहास

इटावा हा उत्तर प्रदेशातील महत्वाचा जिल्हा असून यादवांचा गड राहिला आहे. या जिल्ह्यातील रहिवासी किंवा मुळ असलेले नऊ नेते सध्या संसदेत पोहचले आहेत. त्यामुळे इतिहास घडला आहे.

Etawah District | Sarkarnama

अखिलेश यादव

अखिलेश यादव यांचे कुटुंब मुळचे इटावामधील आहे. त्यांच्यासह कुटुंबातील पाच जण लोकसभेत निवडून आले आहेत. अखिलेश कनौज मतदारसंघाचे खासदार.

Akhilesh Yadav | Sarkarnama

डिम्पल यादव

अखिलेश यांच्या पत्नी असून मैनपुरी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्या यापुर्वीही खासदार होत्या.

Dimple Yadav | Sarkarnama

रामगोपाल यादव

राज्यसभेचे खासदार असून अखिलेश यांचे चुलते आहेत. समाजवादी पक्षाचे महासचिवपदही त्यांच्याकडे आहे.

Ram Gopal Yadav | Sarkarnama

धर्मेंद्र यादव

आझमगढ लोकसभा मतदारसंघातून विजयी. अखिलेश यांचे चुलत बंधू असून अभय राम यादव यांचे पुत्र आहेत.

Dharmendra Yadav | Sarkarnama

अक्षय यादव

रामगोपाल यादव यांचे पुत्र व अखिलेश यांचे चुलत बंधू. फिरोजाबाद लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय.

Akshay Yadav | Sarkarnama

आदित्य यादव

बदायूं मतदारसंघातून विजयी. शिवपाल यादव यांचे पुत्र व अखिलेश यांचे चुलत बंधू असून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

Aditya Yadav | Sarkarnama

जितेंद्र दोहरे

इटावा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार. समाजवादी पक्षाचे नेते असून भाजप खासदाराचा पराभ करून लोकसभेत पोहचले.

Jitendra Gohre | Sarkarnama

गीता शाक्य

भाजपच्या राज्यसभेच्या खासदार असून मुळच्या इटावा जिल्ह्यातील आहेत. उत्तर प्रदेशातील काही भागांत शाक्य कुटुंबाचा दबदबा.

Geeta Shakya | Sarkarnama

देवेश शाक्य

उत्तर प्रदेशातील एटा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहे. समाजवादी पक्षाचे नेते असून मुळचे इटावा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

Devesh Shakya | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्री ते 'पोक्सो' गुन्ह्यापर्यंत...