Shahu Maharaj News : अबब ! 147 कोटी जंगम तर 149 कोटींची स्थावर मालमत्ता; 6 कोटींची वाहने; शाहू महाराजांची संपत्ती किती?

Chetan Zadpe

300 कोटींची संपत्ती -

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्याकडे एकूण 300 कोटींची संपत्ती आहे.

Shahu Maharaj News

147 कोटींची जंगम मालमत्ता -

उमेदवारी अर्ज भरताना शाहू महाराजांनी आपली संपत्ती घोषित केली आहे. त्यांच्याकडे147 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Shahu Maharaj News

149 कोटींची स्थावर मालमत्ता -

शाहू महाराजांकडे 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे.

Shahu Maharaj News

सोने चांदी -

1 कोटी 56 लाख किमतीचे सोने, तर 55 लाखांचे किमतीचे चांदीचे दागिने शाहू महाराजांकडे आहेत.

Shahu Maharaj News

वाहनांची संख्या -

6 कोटी रुपये मूल्यांची वाहने शाहू महाराज यांच्या नावावर नोंद आहेत. जगातील दुर्मीळ मेबॅक कार त्यांच्याकडे आहे. मर्सिडीज बेंझच्या तीन कार, एक इनोव्हा आणि एक महिंद्रा थार या वाहनांचाही समावेश आहे.

Shahu Maharaj News

शेतजमीन -

शाहू महाराज यांच्या नावावर 122 कोटी 88 लाख किमतीची शेतजमीन असल्याचे अर्जात नमूद आहे.

Shahu Maharaj News

याज्ञसेनीराजे यांची संपत्ती -

शाहू महाराजांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावावर 17 कोटी 35 लाख जंगम, तर 23 कोटी 71 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आहे.

Shahu Maharaj News

न्यू पॅलेस -

राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथील घर आणि न्यू पॅलेसची इमारत शाहू महाराज यांच्या नावावर आहेत.

R

Shahu Maharaj News

NEXT : लोकसभा अध्यक्षांच्या कन्येनं 'राज'मार्गावर न जाता निवडला प्रशासकीय मार्ग...