शाहू महाराजांना राजर्षी का म्हणतात ? कोणी दिली ही पदवी?

सरकारनामा ब्युरो

राजर्षी शाहू महाराज यांनी हयातभर रयतेची काळजी वाहिली. बहुजनांविषयी प्रचंड तळमळ आणि आस्था असणारा हा राजा होता.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, उद्योग या क्षेत्रांना बळ मिळेल, अशी धोरणे राबवली. अनेक सामाजिक सुधारणांचा पाया घातला.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

महिलांचे शिक्षण, बहुजनांसाठी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांनाच आरक्षणाचे जनक म्हटले जाते.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रजाहितदक्ष धोरणांचा, सामाजिक सुधारणांचा आजही जगभर अभ्यास केला जातो.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

म्हणूनच शाहू महाराजांना राजांमधील ऋषी म्हणजेच राजर्षी अशी पदवी देऊन गौरविण्यात आले.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

आधुनिक इतिहासात आणि समाजात या गौरवाला पात्र ठरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून फक्त शाहू महाराजांचाच विचार केला गेला.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

1919 साली अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाकडून कानपूरच्या परिषदेत शाहू महाराजांना 'राजर्षी' पदवी बहाल करण्यात आली.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

यापूर्वी 'राजर्षी' ही पदवी सीतामाईचे पिता राजा जनक यांना दिली गेली आहे

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

जो राजा राजगादीकडे केवळ कर्तव्य भावनेने पाहतो, तिथले उपभोग घेताना त्यांचा मनातून त्याने त्याग केलेला असतो, असा ऋषीसमान राजा म्हणजे 'राजर्षी' होय.

कॉर्पोरेट ग्लॅमर सोडून राजकारणात; आता आमदारकीची लॉटरी...

Alifa Ahmed | Sarkarnama
येथे क्लिक करा