Aslam Shanedivan
भारतीय वायू दलाच्या इतिहासात शक्ती शर्मा यांनी नवा इतिहास घडवला असून त्या अवैद्यकीय म्हणून हिल्या महिला एअर व्हाइस-मार्शल ठरल्या आहेत.
संरक्षण मंत्रालयाने रिलीज केलेल्या प्रेस रिलीजमधून ही माहिती देण्यात आली असून प्रदीर्घ अनुभवातून न्याय त्या न्याय देतील असेही यात म्हटलं आहे.
१८ जून १९९४ मध्ये IAF च्या शिक्षण विभागात रूजू झालेल्या शक्ती शर्मा यांना वायू दलातील तीन दशकांचा अनुभव आहे.
शक्ती शर्मा यांनी आतापर्यंत अनेक ट्रेनिंग स्टेशन, फिल्ड स्टेशन, कमांड हेडक्वार्टर आणि एअर हेडक्वार्टमध्ये सेवा बजावली आहे.
शक्ती शर्मा या वैद्यकीय शाखेव्यतिरिक्त भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन होणाऱ्या पहिला महिला अधिकारी देखील होत्या.
शक्ती शर्मा यांनी आयआयटी कानपूर आणि पुणे विद्यापीठात IAF चेअर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात मोठी भूमिका बजावलीय.
भारतीय हवाई दलात पहिला एअर वाईस मार्शल होण्यापूर्वी त्या कपूरथला सैनिक स्कूलमध्ये मुख्याध्यापक होत्या.