Mayur Ratnaparkhe
राजस्थानमधील भारतीय जनता पार्टीचे नेते मदन राठोड यांची पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष सारख्या महत्त्वाच्या पदावर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मदन राठोड यांना मिठाई खाऊ घालून त्यांचे अभिनंदन केले.
याशिवाय राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही मदन राठोड यांचे तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजप प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
''हे पद नाही तर जबाबदारी आहे. मी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी काम करेन.'' असं मदन राठोड यांनी सांगितलं आहे.
मदन राठोड हे राजस्थान भाजपमधील एक मोठे नेते आहेत.
राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या ते 70 वर्षांचे आहेत.
1970 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत.
1980च्या दशकाच्या मध्यात ते भाजपमध्ये सामील झाले.
2003 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदार झाले आणि नंतर 2013मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले.