Rajanand More
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर तब्बल सहा वर्षे काम केल्यानंतर शक्तिकांत दास हे मंगळवारी निवृत्त झाले. कोरोना काळातील बँकेची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.
आयएएस संजय मल्होत्रा हे बुधवारी गव्हर्नरपदाची सुत्रे हाती घेतील. मल्होत्रा हे केंद्रात महसूल विभागाचे सचिव आहेत.
शक्तिकांत दास आणि मोदी सरकारमध्ये काही मुद्द्यांवर वाद असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्यातूनच दास यांना मुदतवाढ दिली नाही, अशीही चर्चा आहे.
देशातील महागाई हा कळीचा मुद्दा ठरल्याचे मानले जाते. महागाई आटोक्यात आणण्यासाठी रेपो रेट कमी करण्याची मागणी काही केंद्रीय मंत्र्यांनी केली होती.
केंद्रीय मंत्र्यांच्या मागणीनंतरही दास यांनी रेपो रेट कमी न करता तो स्थित ठेवला. अनेक महिने रेपो रेट 6.50 टक्के ठेवण्यात आला. दास यांच्या या भूमिकेवरूनच सरकार नाराज होते, अशी चर्चा आहे.
दास यांना प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव बँकेत कामी आला. त्यांना तब्बल 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याचा अनुभव होता.
दास हे सेवानिवृत्त IAS असून सचिव महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभाग या महत्वाच्या पदांवर काम केले होते. तसेच 15 व्या वित्त आयोगाचे आणि भारताचे G20 शेर्पा म्हणून काम केले.
गेल्या 38 वर्षांतील शासनाच्या विविध क्षेत्रांचा दास यांना मोठा अनुभव आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.