सरकारनामा ब्युरो
नागपूर ते गोवा हा ८०० किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
एकूण ८०५ किलोमीटर लांबीचा हा शक्तिपीठ महामार्ग १०० मीटर रुंद असणार आहे.
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
नागपूर ते गोवा महामार्गासाठी जवळपास २७ हजार एकर जमीन लागणार आहे.
या महामार्गामुळे एरवी १८ ते २० तास लागणारा प्रवास आता केवळ सात ते आठ तासांत पूर्ण करता येईल.
या महामार्गासाठी सुपीक जमीन घेतली जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
राज्याच्या विकासासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून यातून आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.
राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे पण तो लादणार नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.