सरकारनामा ब्युरो
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील तब्बल 19 टक्के टोल दर वाढीला मान्यता देण्यात आली आहे.
1 एप्रिल 2025 पासून वाढीव टोल दर लागू होणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे 31 मार्च 2028 पर्यंत हे दर लागू असणार आहेत.
दर वाढीनंतर नागपूर ते मुंबई असा प्रवास करताना एका खासगी चार चाकी वाहनधारकाला तब्बल 1 हजार 445 रुपये टोल द्यावा लागणार आहे.
कार आणि हलकी मोटार वाहने (एलएमव्ही) : प्रति किलोमीटर 2.06 रुपये,
मिनी ट्रक आणि मिनी बस: प्रति किलोमीटर 3.32 रुपये
चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रक प्रति किलोमीटर 6.97 रुपये,
जेसीबी, ट्रेलर आणि बांधकामासाठी वापरली जाणारी वाहने: प्रति किलोमीटर 10.93 रुपये
सात किंवा त्याहून अधिक एक्सेल असलेली वाहने : प्रति किलोमीटर 13.30 टोल आकारला जाणार आहे.