Mangesh Mahale
शिक्षक संच मान्यता २०२६-२०२७ बाबत महत्त्वाची सूचना असून, यासंदर्भातील डेटा फायनल करण्याची सुविधा संच मान्यता पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.
प्रथम आपल्या शाळेच्या Basic Information टॅबवर क्लिक करून शाळेची माहिती फायनल करावी.
Working Post टॅबमधील Get Shalarth या पर्यायावर क्लिक करून शालार्थमधील वर्किंग स्टाफची माहिती फायनल करावी.
वरील माहिती फायनल केल्यानंतर ती EO लॉगिनमध्ये Approve / Reject करण्यासाठी उपलब्ध होईल.
EO लॉगिनमधून माहिती Approve झाल्यानंतर संच मान्यतेसाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल.
सन २०२४-२५ च्या संच मान्यतेसाठी उपलब्ध असलेल्या शाळांकरिताच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे