Rashmi Mane
आईच्या अपमानाने पेटून उठलेली मुलगी… स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत आयपीएस बनली!
शालिनी अग्निहोत्री यांच्या आयुष्यात एक वळण तेव्हा आलं, जेव्हा त्यांच्या आईचा एका व्यक्तीने अपमान केला. त्या क्षणी काहीही न करू शकल्याने त्यांना स्वतःवर खूप राग आला.
त्या अपमानाचं उत्तर त्यांनी दिलं – आपल्या मेहनतीतून. त्यांनी ठरवलं की आता काहीतरी मोठं करून दाखवायचंच!
शालिनी या हिमाचल प्रदेशच्या. शालेय शिक्षण धर्मशालामध्ये. 10वीत 92%, 12वीत 77% मार्क्स. त्यांनी शेतीशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
शालिनी यांनी कोणताही क्लास न लावता फक्त सेल्फ स्टडी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरून अभ्यास केला. 2011 मध्ये 285 रँक मिळवत यूपीएससी क्रॅक केलं.
पहिल्यांदा यश मिळूनसुद्धा त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि स्वतःला अजून सिद्ध केलं. त्यांची मेहनत आणि चिकाटी प्रेरणादायी आहे.
शालिनी म्हणतात, "आईच्या डोळ्यात अभिमान पाहायला मिळाला, तेव्हा वाटलं खरंच यशस्वी झाले."