Shama Mohamed : शिक्षण डॉक्टरकीचं, झाल्या पत्रकार नंतर राजकारणात उडी अन् थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता!

Rashmi Mane

राष्ट्रीय प्रवक्त्या

शमा मोहम्मद या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत.

Shama Mohamed | Sarkarnama

'झोया'

शमा या मूळात व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. तसेच 'झोया' या चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत. या संस्थेच्या माध्यामातून समाजातील वंचित घटकांसाठी काम करतात.

Shama Mohamed | Sarkarnama

बालपण

शमा ह्या मूळच्या केरळच्या आहेत. लहानपणीच त्या कुवेतला शिफ्ट झाल्या.

Shama Mohamed | Sarkarnama

शिक्षण

हायस्कूलनंतर त्यांनी वैद्यकशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंगळूरू विद्यापीठातून दंत शस्त्रक्रिया या विषयात बॅचलर डिग्री मिळवली.

Shama Mohamed | Sarkarnama

पत्रकार म्हणून काम करण्याची संधी

कॉलेजमध्ये असल्यापासूनच महिलांच्या हक्कांसाठी त्या आवाज उठवतात. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत प्राक्टिस सुरू केली. त्याच काळात त्यांना 'झी' न्यूजमध्ये पत्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली .

Shama Mohamed | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

'झी' न्यूजमध्ये काही काळ पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी पुन्हा डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. मात्र, त्यांना समाजसेवा आणि राजकारणात रस होता. त्यामुळे त्यांनी 2015 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजकारणात प्रवेश केला.

Shama Mohamed | Sarkarnama

मीडिया पॅनेलिस्ट

31 डिसेंबर 2018 रोजी राहुल गांधी यांनी त्यांची मीडिया पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती केली होती.

Shama Mohamed | Sarkarnama

Next : रातोरात बदलले श्रीमंतांचे जग, जाणून घ्या कोण बनले आता 'नंबर वन'

येथे क्लिक करा