Chetan Zadpe
बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातून चिराग पासवान यांच्या पक्ष एलजेपी रामविलासने शांभवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
शांभवी या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटवर्तीय मंत्री अशोक चौधरी यांची मुलगी आहे. तसेच त्या माजी आयपीएस अधिकारी कुणाल किशोर यांची सून आहे.
नुकतेच शांभवी चौधरी यांचे पती आणि अशोक चौधरी यांचे जावई शायन कुणाल यांनी या मुद्द्यावरून चिराग पासवान यांची भेट घेतली होती. त्यांचे चुलत बंधू राजकुमार राज हे ही खासदार आहेत.
शांभवी चौधरी यांनी दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. समाजशास्त्रात पीएचडी केली आहे.
शांभवी चौधरीच्या पतीचे नाव शायन कुणाल आहे. शायन आणि शांभवीचे 2022 मध्ये लग्न झाले. त्यांच्या लग्नाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही हजेरी लावली होती.
शांभवी यांचे वडील अशोक चौधरी हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे नेते आहेत. सध्या ते नितीश सरकारमध्ये ग्रामीण व्यवहार खात्याचे मंत्री आहेत.
विशेष म्हणजे शांबवी यांचे वय 25 वर्ष असून ते लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात तरुण उमेदवार आहेत.